शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

कविता – रागाच्या भरात

 रागाच्या भरात कोणी काहीही बोलून जाई 

त्या बोलण्याचा नेम लावणे शक्यच नाही 


रागाच्या भरात शब्द पटकन निसटून जाई 

त्या निसटलेल्या शब्दाला झेलण शक्यच नाही 


रागाच्या भरात कोणी काहीही निर्णय घेई 

तो घेतलेला निर्णय बरोबरच असेल अस शक्यच नाही 


रागाच्या भरात कधी तोंडातून कटू सत्य येई 

ते कटू सत्य ऐकून समोरच्याला राग न येणे शक्यच नाही 


रागाच्या भरात कोणी कोणाचं हृदय तोडून जाई 

ते तुटलेल हृदय लगेच जुडण शक्यच नाही 


रागाच्या भरात कधी चांगली भाषाही वाईट होऊन जाई  

कारण वाईट लोकांना चांगली भाषा समजण शक्यच नाही 


रागाच्या भरात बोलयाने नेहमीच काम वाया जात नाही 

कधी वाया गेलेल काम रागाच्याच भरात, पुन्हा वठणीवर येई 




शब्द-स्नेह – समिक्षा काळणे (14-7-2020)


कविता –सावला रंग

बडा इतराता ये मन  की सावला है ये तन  निहारू जब दर्पण  प्यार करू ईसे अर्पण  डगोसे तो डरे वो गोरा रंग पर ये सावला घुले सबके संग  गोरे तो थे पह...