शनिवार, १३ एप्रिल, २०२४

कविता –सावला रंग


बडा इतराता ये मन 

की सावला है ये तन 


निहारू जब दर्पण 

प्यार करू ईसे अर्पण 


डगोसे तो डरे वो गोरा रंग

पर ये सावला घुले सबके संग 


गोरे तो थे पहलेसेही फरेबी 

तब सावलोने मिटायी गरीबी 


किसीसे पुछो अपणी राय 

क्या लेंगे ? दूध या चाय 

तो बोले, बस..! एक कप सावली चाय !



शब्दस्नेह – समिक्षा काळणे

कविता – घाई

आजकाल, 

सकाळच कोंबड ओरडत नाही 

पण अलार्म ची ट्रिंग ट्रिंग झोपू देत नाही


उठल्यावर सकाळी अंघोळी ची घाई 

चिमण्याची किलबिल कोणी एकतही नाही


पटकन आवरून सगळे कामाला जाई 

सोबत बसून कोणी जेवणत दूर ,

नास्ता ही करत नाही


दिवसभर विश्रांती न घेता काम करत राही

अरे , तू माणूसच आहेस , मशीन थोडी काही 


काम संपवून पटकन घरी जायची घाई 

घरी आल्यावर सर्वांसोबत प्रेमानं बोलणं त दूर ,

कोणी कोणाकडे पाहतही नाही 

कारण हातातला मोबाइल लक्ष वेधून घेई 



रात्री , जेवण करून पटकन झोपायची घाई

कारण, सकाळी अलार्म ची ट्रिंग ट्रिंग झोपू देत नाही 

अलार्म ची ट्रिंग ट्रिंग झोपू देत नाही 


अरे माणसा, तुला एवढी कशाची घाई ?

आपल्या माणसां सोबत काही आठवणीही बनवत नाही 


कोणाला माहीत , उद्या तू जरी असला 

तरी ते असतील की नाही ??


म्हणून थोडा वेळ स्वतःला आणि आपल्यांनाही दे 

कारण गेलेला क्षण परत येत नाही 

खरच परत येत नाही......


शब्दस्नेह – समिक्षा काळणे  

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

कविता - पण इतकं करशील का?


ऐक ना फार जास्त नाही, पण इतकं करशील का?

हजारोंच्या गर्दीतून तुझ्यासाठी रस्ता मी शोधेल,



फक्त, रस्ता क्रॉस करताना हात माझा धरशील का? 

एकट्यात स्तुती नाही केली तरीही चालेल,

पण चार चौघांमध्ये तोरा माझा मीरवशील का?

ऐक ना फार जास्त नाही, पण इतकं करशील का?

तुला वाटेल तिथे आपण फिरायला जाऊच,

पण सर्वप्रथम मला अक्कलकोटला नेशील का?

स्वामींकडे मी तुझ्यासाठी सर्व काही मागेल,

फक्त त्यांच्या साक्षीने, आयुष्यभर साथ मला देशील का?

सांग ना फक्त इतकं करशील का? 

साथ मला देशील का?

❤️

 शब्दस्नेह – समिक्षा काळणे 



कविता –सावला रंग

बडा इतराता ये मन  की सावला है ये तन  निहारू जब दर्पण  प्यार करू ईसे अर्पण  डगोसे तो डरे वो गोरा रंग पर ये सावला घुले सबके संग  गोरे तो थे पह...