शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

तू आहेस 🌸❤

 डियर डियर सिस्टर,

खुशी,

तुझी 12th झाली, तू आता एडुकेशन साठी घरा बाहेर पडणार, कस राहायचं वगैरे वगैरे तुला सांगायची गरज नाही, तरीही तुला एक सांगायचं होत, तू फार लवकर कॉन्फयुज्ड होते, सरळ सरळ बोलायचं झाल तर, काही टेन्शन आलं की लगेच बावरते, काय करू, काय करू, कस करू, कस होईल... वगैरे वगैरे करते... म्हूणन एक सांगायचं होत की, 

जगात तुझा आजूबाजूला जे पण काही आहे, जे तुझा सोई साठी आहे, वारंवार तुझा कामात येते, मग ते काहीही असो कोणी व्यक्ती असो, एखादी वस्तू असो... काहीही....... सर्व हॆ फक्त 'तू आहेस' म्हूणन तुझा आहेत..

त्या वस्तूंमुळे, व्यक्तीमुळे तू इथे नाहीस..... जर तू नसती तर काहीही नसत... म्हूणन 'स्वतःला' महत्व दे.. जगात तुझासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही, तुला वाट्टेल ते तू करू शकते कारण काय 'तू आहेस' म्हूणन...

तुझी इच्छा हा तुझा तुझ्यासाठी हुकूम आहे.. म्हूणन तुला वाट्टेल ते कर, वाट्टेल तसे कर.. स्वतःवर विश्वास ठेव.. स्वतःवर प्रेम कर.. स्वतःची काळजी घे. 

तुला सर्व बाजूनी एक सीमा आहेत आणि त्याचा सेंटर तू आहेस ते तुझा आयुष्याच सर्कल आहे आणि फक्त तुझं आहे, त्यात कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही, हा तुझा स्वतंत्र निर्णय आहे, मान्य आहे कधी लोकांना ओळखायला चुकतो आणि चुकून ते आपल्या सीमेट शिरतात, कालांतराने ते आपल्या आवडली नाही किंवा नंतर तुला त्यांचा त्रास झाला तर त्यानां कायम चं बाहेर काढून दे, मग त्यानां काय वाटेल याचा विचार तू नको करू नकोस..

आणि जे तुझ्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर तुही जीवापाड प्रेम कर.. त्यांना तुझा आयुष्याचा शेवट च्या क्षणा पर्यन्त जप.. 

आणि कधी एकटं वाटलं, आपल कोणीच नाही, सर्व स्वार्थी आहेत, हॆ मी कोणाला सांगू, कोणाला बोलू, वगैरे वगैरे विचार आले तर तुला समजून घ्यायला नेहमी मी आहे आणि मी नसली जरी तरी तुझा साठी फक्त 'तू आहेस'


तुझी समी..

(मी मोठी असून पण तू ताई म्हणतं नाही 😒)

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

कविता - त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...

 

क्षणात जाई इकडे, क्षणात जाई तिकडे,

त्याने का नाही जावे ? त्यालाही फिरावेसे वाटते

हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...


कधी पक्षाप्रमाणे आकाशात उंच उडवेसे वाटते

कधी धबधब्या प्रमाणे उंचाहून खाली पडावेसे वाटते,

कधी नदीप्रमाणे शांत वाहावेसे वाटते

हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...


कधी खट्याड मुला प्रमाणे मनसोक्त हसावेसे वाटते,

कधी बंद खोलीत स्वतःचे दुखं सावरत मोठ्याने रडवेसे वाटते,

कधी दूर, शांत, एकटेच स्वप्नात रमत बसावेसे वाटते ,

हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...


नाही आवडत त्याला तुमचे ऐकायला,

ठीक आहे, तरीही त्याला ऐकावे लागते ,

पण सर्वांचे ऐकून स्वतःचाच इच्छेप्रमाने करावेसे वाटते

हो ना , त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...


कधी स्वतःच्या चुकींसाठी स्वतःशीच भांडावेसे वाटते

कधी रागही येतो, जेव्हा चूक नसतांनाही त्यालाच ऐकावे लागते

“पण माझी चुकच नाही” , असे जगाला ओरडून सांगावेसे वाटते

हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...


कधी सर्वान सोबत बोलावे, रहावेसे वाटते

कधी मना प्रमाणे स्वप्नही बघावेसे वाटते

आणि ते स्वप्न पूर्णही करावेसे वाटते

हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते…


हो ना ते फारच विचित्र असते, कारण

त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते…

पण तुम्ही त्या मनाला कधी विचारता

‘ ऐ मना ’ तुला काय वाटते ?




शब्दस्नेह-समिक्षा काळणे 

(माझी पहिली कविता )

जून २०२० 

कविता – रागाच्या भरात

 रागाच्या भरात कोणी काहीही बोलून जाई 

त्या बोलण्याचा नेम लावणे शक्यच नाही 


रागाच्या भरात शब्द पटकन निसटून जाई 

त्या निसटलेल्या शब्दाला झेलण शक्यच नाही 


रागाच्या भरात कोणी काहीही निर्णय घेई 

तो घेतलेला निर्णय बरोबरच असेल अस शक्यच नाही 


रागाच्या भरात कधी तोंडातून कटू सत्य येई 

ते कटू सत्य ऐकून समोरच्याला राग न येणे शक्यच नाही 


रागाच्या भरात कोणी कोणाचं हृदय तोडून जाई 

ते तुटलेल हृदय लगेच जुडण शक्यच नाही 


रागाच्या भरात कधी चांगली भाषाही वाईट होऊन जाई  

कारण वाईट लोकांना चांगली भाषा समजण शक्यच नाही 


रागाच्या भरात बोलयाने नेहमीच काम वाया जात नाही 

कधी वाया गेलेल काम रागाच्याच भरात, पुन्हा वठणीवर येई 




शब्द-स्नेह – समिक्षा काळणे (14-7-2020)


जिवनात एकदा तरी वाचावी "श्रीमद्भगवद्गीता"

 भाग्यवान आहे मी, कि "गीता वाचायची" अशी प्रेरणा माझ्यात जागृत झाली. आज एका व्यक्ती बरोबर बोलताना मला realize झाल की, नाही! मी बदलतेय माझ्यात खुप चांगले बदल घडुन येत आहेत. माझ्या वागण्यात, बोलण्यात, राहण्यात, स्वभावात, दिसण्यात, बघण्यात, खाण्यात, पीण्यात तसेच विचार करण्यातही खुप बदल होतोय आणि कोणाला / लोकांना तो बदल दिसो न दिसो पण मला तो माझ्यात दिसतोय अन तो बघून मला खूप समाधान वाटतेय मी माझ्या बद्दल खुप खुश आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गीतचे आज फक्त सहाच अध्याय संपवले अजून बारा अध्याय बाकी आहेत म्हणजे मला अजून भरपूर काही भेटायच / शिकायचं बाकी आहे, गीता या शब्दातच इतकी ताकत / प्रसन्नता आहेना ही गीता म्हटल्यावरच पवित्रतेचा भाव मनात

जागृत होतो. वाचतांना तूर खुप उत्सुकत वाटते कि अजून काय आहे पुढे, अजून नियतीची काय सत्यता आहे, हे वाचण्यासाठी मन व्याकुळ होतच आपण हे तेव्हाच होत जेव्हा आपल्या (साधकाच्या) मनात आपला उद्धार करून घेण्याची इच्छा असते. अन् आधी २-४% जरी पुण्य कर्म केले असतील ना तर ती इच्छा ईश्वरच निर्मान करतो यात कुठलाही संशय नाही. खर तर गीता माणसाला जिवनाकडे बघण्याचा खुप सुंदर दृष्टीकोन देते. तुम्ही आयुष्याला खुप सकारात्मक दृष्टीकोनातून बघाल . ही माझी खात्री आहे.

मान्य आहे मला कि, या धकाधकीच्या जीवन शैलीत माणसाला दोन मिनीट निवांत बसायला वेळ पुरत नाही. अन् वेळ असला तरीही आज वेड मात्र माणसाला वेगळेच लागले आहेत, वेगळच म्हणजे बदलत्या जीवन शैलीत माणसावे छंद आवडी निवडी खुप बदललेल्या आहेत. आध्यात्माची आवड खुप लोकांना राहीली आहे. आध्यात्मा कडे बघण्याची लोकांची दृष्टी जरा बदललेली मला दिसतेय तसा अनुभवही मला आला. आता बदललेली म्हणजे कशी ? लोक आध्यात्माकडे फावल्या वेळेत केली जाणारी गोष्ट किंवा संकट काळातच देवाकडे जायच अस काहीतरी लोकांच वागण मला दिसतेय. इतकच काय आधी मी पण हेच करायची.. पण काही घटना, व्यक्ति किंवा परिस्थितींमुळे आपण नैराश्याचे शिकार होतो आणि आजकाल तर लोकांची सहन सक्ती कमी झाल्याने खुप लोकांना नैराश्यजन्य परिस्थितीशी लढावे लागतेय ज्याला आपण Depression म्हणतो . अगदी १० पैकी ७ लोक तर 'याचे शिकार मला दिसून आले आहेत. वयाने लहान असो, मोठे असो, नासमज किंवा समजदार लोक ही hang' पडलेले दिसतात. हो! अगदीच, smart phone सारखे तर या परिस्थितीस जास्त वेळ न राहता यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे गीता...

जिवनाच्या अंतीम ध्येयाचा मार्ग दाखवनारी गीता.

 समजून सांगणारी गीता, सांभाळणारी गीता 

समृधी म्हणजे गीता, संस्कृती म्हणजे गीता

अंताम सत्य गीता, ईश्वर वचन म्हणजे श्रीमद्भगवद्गीता:


म्हणून जीवनात एकदातरी वाचावी "श्रीमद्भगवद्गीता:"



-समिक्षा

27Aug2021


कविता –सावला रंग

बडा इतराता ये मन  की सावला है ये तन  निहारू जब दर्पण  प्यार करू ईसे अर्पण  डगोसे तो डरे वो गोरा रंग पर ये सावला घुले सबके संग  गोरे तो थे पह...