शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२

जिवनात एकदा तरी वाचावी "श्रीमद्भगवद्गीता"

 भाग्यवान आहे मी, कि "गीता वाचायची" अशी प्रेरणा माझ्यात जागृत झाली. आज एका व्यक्ती बरोबर बोलताना मला realize झाल की, नाही! मी बदलतेय माझ्यात खुप चांगले बदल घडुन येत आहेत. माझ्या वागण्यात, बोलण्यात, राहण्यात, स्वभावात, दिसण्यात, बघण्यात, खाण्यात, पीण्यात तसेच विचार करण्यातही खुप बदल होतोय आणि कोणाला / लोकांना तो बदल दिसो न दिसो पण मला तो माझ्यात दिसतोय अन तो बघून मला खूप समाधान वाटतेय मी माझ्या बद्दल खुप खुश आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गीतचे आज फक्त सहाच अध्याय संपवले अजून बारा अध्याय बाकी आहेत म्हणजे मला अजून भरपूर काही भेटायच / शिकायचं बाकी आहे, गीता या शब्दातच इतकी ताकत / प्रसन्नता आहेना ही गीता म्हटल्यावरच पवित्रतेचा भाव मनात

जागृत होतो. वाचतांना तूर खुप उत्सुकत वाटते कि अजून काय आहे पुढे, अजून नियतीची काय सत्यता आहे, हे वाचण्यासाठी मन व्याकुळ होतच आपण हे तेव्हाच होत जेव्हा आपल्या (साधकाच्या) मनात आपला उद्धार करून घेण्याची इच्छा असते. अन् आधी २-४% जरी पुण्य कर्म केले असतील ना तर ती इच्छा ईश्वरच निर्मान करतो यात कुठलाही संशय नाही. खर तर गीता माणसाला जिवनाकडे बघण्याचा खुप सुंदर दृष्टीकोन देते. तुम्ही आयुष्याला खुप सकारात्मक दृष्टीकोनातून बघाल . ही माझी खात्री आहे.

मान्य आहे मला कि, या धकाधकीच्या जीवन शैलीत माणसाला दोन मिनीट निवांत बसायला वेळ पुरत नाही. अन् वेळ असला तरीही आज वेड मात्र माणसाला वेगळेच लागले आहेत, वेगळच म्हणजे बदलत्या जीवन शैलीत माणसावे छंद आवडी निवडी खुप बदललेल्या आहेत. आध्यात्माची आवड खुप लोकांना राहीली आहे. आध्यात्मा कडे बघण्याची लोकांची दृष्टी जरा बदललेली मला दिसतेय तसा अनुभवही मला आला. आता बदललेली म्हणजे कशी ? लोक आध्यात्माकडे फावल्या वेळेत केली जाणारी गोष्ट किंवा संकट काळातच देवाकडे जायच अस काहीतरी लोकांच वागण मला दिसतेय. इतकच काय आधी मी पण हेच करायची.. पण काही घटना, व्यक्ति किंवा परिस्थितींमुळे आपण नैराश्याचे शिकार होतो आणि आजकाल तर लोकांची सहन सक्ती कमी झाल्याने खुप लोकांना नैराश्यजन्य परिस्थितीशी लढावे लागतेय ज्याला आपण Depression म्हणतो . अगदी १० पैकी ७ लोक तर 'याचे शिकार मला दिसून आले आहेत. वयाने लहान असो, मोठे असो, नासमज किंवा समजदार लोक ही hang' पडलेले दिसतात. हो! अगदीच, smart phone सारखे तर या परिस्थितीस जास्त वेळ न राहता यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे गीता...

जिवनाच्या अंतीम ध्येयाचा मार्ग दाखवनारी गीता.

 समजून सांगणारी गीता, सांभाळणारी गीता 

समृधी म्हणजे गीता, संस्कृती म्हणजे गीता

अंताम सत्य गीता, ईश्वर वचन म्हणजे श्रीमद्भगवद्गीता:


म्हणून जीवनात एकदातरी वाचावी "श्रीमद्भगवद्गीता:"



-समिक्षा

27Aug2021


कविता –सावला रंग

बडा इतराता ये मन  की सावला है ये तन  निहारू जब दर्पण  प्यार करू ईसे अर्पण  डगोसे तो डरे वो गोरा रंग पर ये सावला घुले सबके संग  गोरे तो थे पह...