मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

कोरोना जास्त danger कि लोक..? जास्त त्रासदायक कोण?

महत्वाच काय असत जीवनात.. लोकांचे मत की तुम्हाला जाणवाणाऱ्या भावना?; की त्याना वाईट वाटू नये म्हणून आपल्या भावनांना दुर्लक्षित करून लोकांच्या मतानुसार वागणं.. आणि समझा आपण लोकांचं ऐकलं सुद्धा तरी काय होत..? मान्य आहे लोकांचं ऐकणं ही बरोबर च आहे ते ही आपल्या चांगल्या साठीच सांगत असतात... पण आपल्या मनाला जे बरोबर वाटत त्याच काय? आपल्या भावना वेगळ्या असतील तर? आपला दृष्टीकोन वेगळा असेल तर?
एक मिनिट.. Title वरून तुम्हाला जर वाटत आहे की मला कोरोना झालेला आहे तर तुम्ही बरोबर आहात.. हो आहे मला कोरोना.. आणि मी घेतीये माझी काळजी.. हा कोरोना खरंच इतका भयंकर आहे का.. कोरोना असल्याचा मला कसा शोध लागला.. अश्या असंख्य प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतीलच.. तर झालं असं की....
आधी तर असं वाटलं कि..
मी कस काय यारर...
अस नाही होऊ शकत...
अस कस शक्य आहे..
पण झालं..
 अन मनाला जरी शक्य वाटत नसल, तरीही "जे आहे ते आहे" अन "तसच" आहे, शेवटी आपण कितीही मनाल,स्वतःला समजावण्यचा प्रयत्न केला तरीही सत्य हे स्विकारावच लागत कारण सत्य हे "एकच असत, न बदलणार, कायम, ठाम" आणि त्याच्यासोबत राहवाच लागत.
बर चला,
सांगते हे कशाबद्दल बोलतेय आधी नेमक झालं काय, ते ही ऐकून घ्या, 6-7 दिवसांपूर्वी थोड घस्यात दुखणं,मग थोडी सर्दी नंतर ताप आणि खूप अशक्तपणा आलेला, तर मी हॉस्पिटल गेली normal डॉक्टरांनी 4दिवसांच्या tab दिल्या.Tab घेतल्या पण तरीही त्या घेऊन ही ताप कमीच होत नव्हता आणि अशक्तपणा ही खूप आलेला म्हणून मग परत डॉक्टर कडे जाऊ असं ठरवलं, तर डॉक्टर बोलले आजूबाजूला वातावरण असं चालू आहे तर तुम्ही एकदा covid test करा आणि जर test निगेटिव्ह आली तर ब्लड test करू,
म्हंटल ठीक आहे कस तरी मन घट्ट करून, माझी test निगेटिव्हच येईल या विचाराने test करायला गेली, पूर्ण रस्त्यात विचारांचं वादळ, काय होईल,कस होईल test पॉसिटीव्ह आली तर कस करायच, कोरोना आधी खूप normal वाटत होता पण आता तो इतक्या जवळ कसा काय आला हाच प्रश्न,पण नंतर एक मन म्हणत होत कि "Be positive, you will not be positive". असं सर्व चालू असताना जवळच covid center आलं एकटीच मध्ये गेली test करताना खरंतर भीती वाटतच होती डॉक्टरांनी नाकात स्टिक टाकून sample घेतलं,,4-5सेकंड नाकातून भाळ-भाळ रक्त आलं, माझा हृदयाचे ठोके खूप जास्त वाढले होते "God.... Negative येऊ दे रे.. Plzz plzz... " असं म्हणता म्हणता थोड्या वेळातच सिरांनी माझं नाव घेतलं रिपोर्ट आला... 
रिपोर्ट वर विश्वासच बसत नव्हता.. 
Test पॉसिटीव्ह आली मग काय... थोड टेन्शनच आलं.. आता कस करयच? कुठं राहायचं? घरी गेली तर मम्मी पप्पा आहेत पप्पा ची तब्बेत थोडी खराब आहे अन वयनुसार त्यानंची immunity पण कमीच अन तसही माझा मुळे घरच्यानां, त्रास मला कधीच आवडणार नाहीच म्हणून घरी जाण मला बरोबर वाटत नव्हतं अन covid center ला राहील तर ते 15 दिवस compulsory ठेवतात नंतर घरी जायचा तर अवघड होईल,अन इथं ही राहील तरी जेवणाचं काय? काय करू मी आता????एकटी कस हॅन्डल करू सर्व??असे भरपूर काही प्रश्न....
म्हणेज घरी सांगायची पण इच्छा होत नव्हती पण इतकी मोठी गोष्ट आहे तर सांगाव लागेल म्हणून फक्त भावला सांगितलं आमचं बोलण झाल तो डॉक्टर असल्यामुळे त्याने खूप धीर दिला मला आणि घरी सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका माझी काळजी घायला आहेत इथे roomate वगैरे पण actually इथे कोणीच नव्हतं आणि जिथे राहतेय त्याच फ्लॅट वर home quarantine मी झाली, डॉक्टरांसोबत बोलणं झालं tab घेतल्या अन quarantine period चालू झाला, काही दिवस झाला त्रास म्हणेज जिभेला टेस्ट येत नव्हती काहीही खाल्लं तर, खूप जास्त अशक्तपणा हे सर्व होत पण tab वगैरे घेने,गरम पाणी पिणे काढा पिणे या साऱ्या गोष्टीनंतर तो 6-7दिवसात त्रास कमी होऊन गेला, अन हळू हळू मी normal होतेय काहीही मोठ आपल्याला झालेलं नाही असं वाटू लागलं म्हणेज ओव्हरऑल फक्त कोरोनाबद्दल बोलायचं झालं तर तो आजार म्हणून इतका पण danger अन घाबरण्या सारखा आजार नाही जितकं लोक त्याला समजतात तितका danger तर मुळीच नाही.
सध्याही quarantine period ch चालू आहे तर मला सध्या कोरोना पेक्षा लोकांचाच जास्त त्रास होतोय. त्यांच्या वागण बोलण अचानक च chnge होऊन गेलं जस मला कोणता महारोग झाला..😣 हे फक्त आपल्या जवळच्या लोकांना बद्दल..म्हणेज जे लोक राहायला जवळ असतात पण मनाने नाही असे काही, म्हणजे म्हणायलाच काही लोक आपल्या जवळचे म्हटल्या जातात पण खरंच आपले म्हंटल्याणी आपले लोक आपले होतात का? जेव्हा आपले आपल्यानं सोबत आपल्या सारखे वागतील तेव्हाच ते आपले म्हणण्याचा लायकीचे असतात मला तरी असं वाटतेय.
मग जवळचे लोक खरंच जवळचे असतात का? हाही एक प्रश्नच....
असो....
आणि वपु म्हणतात तेही खरंच आहे कि "अंत आणि एकांत यामध्ये माणूस "एकांताला" जास्त घाबरतो" कारण एकांत हा खरंच भयंकर असतो हे ही जाणवलं काही प्रमाणात. पण तस बोलायचं झालं तर थोडीफार सवय होती एकांताची मला, या ही काळात एकटीच आहे तर पुन्हा नव्याने स्वतः सोबत खूप गप्पा मारल्या, एकटीनेच डान्स केला गाणी म्हटली, ऐकली काही कथा वाचल्या, ब्लॉग्स वाचले. थोडं लिहायचा प्रयत्न केला. तस पण "जिसका कोई नाही होता उसका मोबाईल होता है" ऑनलाईन किंवा कॉल वर खूप लोकांशी गप्पा ही मारते. मोबाईल हुन लोक खूप धीर देत आहेत. तब्बेतीचा ठाव घेत आहेत. लवकर बरी हो, जेवण कर, tab घे, काळजी घे हे तर कायमचेच mesg आहेतच रोजचे खरंच खूप बर वाटत हे वाचून....😊
आता तब्बेतीत ही खूप सुधारणा आहे....
.
अन Plz तुमच्या जवळ जर कोणाला कोरोना झाला असेल तर त्या वक्ती सोबत प्रेमाने वागा कोरोना हा बरा होतो हा काही महारोग नाही कि जवळ गेल्याने लगेच दुसऱयाला होईल म्हणून असं न वागता जे नियम पाळायला हवेत ते पाळा मास्क लावा,sanitizer वापरा, नको त्या ठिकाणी गर्दी करू नका, सामाजिक अंतर राखा, मानसिक नाही...
.
हे जास्त महत्वाच आहे..
.
धन्यवाद 🙏

कविता –सावला रंग

बडा इतराता ये मन  की सावला है ये तन  निहारू जब दर्पण  प्यार करू ईसे अर्पण  डगोसे तो डरे वो गोरा रंग पर ये सावला घुले सबके संग  गोरे तो थे पह...