क्षणात जाई इकडे, क्षणात जाई तिकडे,
त्याने का नाही जावे ? त्यालाही फिरावेसे वाटते
हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...
कधी पक्षाप्रमाणे आकाशात उंच उडवेसे वाटते
कधी धबधब्या प्रमाणे उंचाहून खाली पडावेसे वाटते,
कधी नदीप्रमाणे शांत वाहावेसे वाटते
हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...
कधी खट्याड मुला प्रमाणे मनसोक्त हसावेसे वाटते,
कधी बंद खोलीत स्वतःचे दुखं सावरत मोठ्याने रडवेसे वाटते,
कधी दूर, शांत, एकटेच स्वप्नात रमत बसावेसे वाटते ,
हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...
नाही आवडत त्याला तुमचे ऐकायला,
ठीक आहे, तरीही त्याला ऐकावे लागते ,
पण सर्वांचे ऐकून स्वतःचाच इच्छेप्रमाने करावेसे वाटते
हो ना , त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...
कधी स्वतःच्या चुकींसाठी स्वतःशीच भांडावेसे वाटते
कधी रागही येतो, जेव्हा चूक नसतांनाही त्यालाच ऐकावे लागते
“पण माझी चुकच नाही” , असे जगाला ओरडून सांगावेसे वाटते
हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते...
कधी सर्वान सोबत बोलावे, रहावेसे वाटते
कधी मना प्रमाणे स्वप्नही बघावेसे वाटते
आणि ते स्वप्न पूर्णही करावेसे वाटते
हो ना, त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते…
हो ना ते फारच विचित्र असते, कारण
त्या मनालाही स्वातंत्र व्हावेसे वाटते…
पण तुम्ही त्या मनाला कधी विचारता
‘ ऐ मना ’ तुला काय वाटते ?
शब्दस्नेह-समिक्षा काळणे
(माझी पहिली कविता )
जून २०२०