आज माझ्यावरच लिहते मी कविता
म्हणून विचार करत होती ‘मी आहे तरी कशी ?’
कोणी म्हणते तू खूप चांगली आहेस
कोणी म्हणते तुझ्यासारखी वाईट तूच आहेस
कोणी म्हणते तू खूप शांत आहेस
कोणी म्हणते ‘थोडी शांत बस’ किती बोलकी आहेस
कोणी म्हणते तू सावळी आहेस
कोणी म्हणते तू सावळी असून पण सुंदर आहेस
कोणी म्हणते आमच्या सोबत पण बोल एकटीच का आहेस
कोणी म्हणते सर्वानसोबत बोलतेस तू किती फ्रँक आहेस
कोणी म्हणते तू सेलफिश आहेस
कोणी म्हणते आता तरी स्वतःचा विचार कर,
आतापर्यन्त दुसर्यांचाच करतात आली आहेस
कोणी म्हणते तू अशी आहेस
कोणी म्हणते तू तशी आहेस
मग म्हटलं खरच विचार करू दे ,
‘मी आहे तरी कशी ?’
विचार केला तर विचारच पडला
एवढ्याश्या आनंदात, मी इतकी हसते कशी
एका छोट्याश्या शब्दात, मी धायमोकळून रडते कशी
कधी कोणी कितीही बर-वाईट बोलल तरी मनात हसते,
खरच मी इतकी बेशरम कशी
माझ्या मनात एवढा कल्लोड असूनही, मी इतकी शांत कशी
एवढासा दिमाग आहे, तरी तो इतका चालवते कशी
एवढी भित्री आहे, तरी इतक्या कलाकार्या करते कशी
कधी-कधी माझाच पाय फटक्यात असूनही, दुसर्यांचा पदर शिवते कशी
तशी दिसायला इतकी सुंदरही नाही पण फोटोत, आहे त्यापेक्षा सुंदर दिसते कशी
बघितल तर माझ्याकडे खूप वेळ असते, तरीही मी इतकी busy कशी
कधी प्रॉब्लेम असूनही, इतके पांचट जोक्स मारतेच कशी
कोणाही सोबत एवढी चांगली राहते, तरीही मला लोक hurt करतातच कशी
खूप विचार केला तरीही पक्यात समजलं नाही ‘मी आहे तरी कशी?’
याच कारण हेच असावं,
आता पर्यन्त राहत आली मी,
लोकांना ‘हवी तशी’
पण आता स्वतःला ओळखायला लोकांनाही दाखवाव लागेल,
मी ‘जशी आहे तशी’
मग मला ही समजेल ‘मी आहे तरी कशी ?’
शब्दस्नेह – समिक्षा काळणे
27-7-2020
